सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी अर्ज करावेत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २६ :- जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट प्राप्त झाले असून, पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे उप आयुक्त (उद्योग व सेवा) यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत अर्जांचे वाटप व स्वीकारण्याची प्रक्रिया दि. ११ मे २०२६ पासून सुरू आहे. प्राप्त अर्जांमधील पात्र कर्ज प्रकरणे बँकांकडे शिफारशीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
अर्ज वाटप व स्वीकारण्याची अंतिम तारीख दि. ३० नोव्हेंबर २०२६ असून, अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तरी इच्छुक सुशिक्षित बेरोजगारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र वाणी — सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित