हजरत सय्यद शाह दाऊद गंज औलिया यांचा ४४८ वा उर्स २९ सप्टेंबरपासून
कुराणखानी, महफिल-ए-जिक्र, संदल शरीफ, चादर पेशी आणि कव्वालीचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- हजरत सय्यद शाह दाऊद गंज लष्करी मगरिबी औलिया (रह.) यांचा ४४८ वा सालाना उर्स यंदाही श्रद्धा आणि अकीदतीच्या वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. मंगळवार, २९ सप्टेंबरपासून गुरुवार, १ ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसीय उर्सनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कुतुब कॉलनी येथील दर्ग्यात होणाऱ्या या उर्सचे आयोजन सय्यद शाह अमीनुद्दीन कादरी, सज्जादानशीन व मुतवल्ली, सय्यद शाह मुहम्मद इरफानुद्दीन कादरी आणि सय्यद शाह अजीजुद्दीन कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. उर्सच्या सर्व कार्यक्रमांना अकीदतमंदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
२९ सप्टेंबर : उर्सला सुरुवात
मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी रात्री ७.३० वाजता कुराणखानी होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता महफिल-ए-जिक्र जामिया सलासिल, ८.३० वाजता मजारे-अकदसचा गुस्ल आणि रात्री ९ वाजता नूरी महफिल आयोजित करण्यात आली आहे.
३० सप्टेंबर : संदल शरीफ व चादर पेशी
बुधवार, ३० सप्टेंबर रोजी नमाज-ए-असरनंतर संदल शरीफ व चादर पेशी करण्यात येणार आहे. त्यानंतर नमाज-ए-मगरिबनंतर तबर्रुक वितरण आणि लंगरचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ वाजता महफिल-ए-फैजान-ए-गौस-ए-आजम होणार आहे.
१ ऑक्टोबर : कव्वालीची महफिल
गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता महफिल-ए-चिश्तिया समां (कव्वाली) आयोजित करण्यात आली आहे. तीनही दिवस होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित