इकरा एच. जे. थिम महाविद्यालयाचा अभिमान! सय्यद ताहिरीम सुबूरची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

जळगाव दि ९ :- इकरा शिक्षण संस्थेच्या एच. जे. थिम आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयाची प्रथम वर्ष बी.एस्सी.ची विद्यार्थिनी सय्यद ताहिरीम सुबूर हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची ५३ किलो वजन गटातून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून, या स्पर्धेत ती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे (KBCNMU) प्रतिनिधित्व करणार आहे.

ताहिरीम सुबूर हिच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या यशामागे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. चांद खान यांचे मोलाचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रोत्साहन लाभले आहे.

महाविद्यालयासाठी ही अभिमानास्पद बाब असून, अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेत ताहिरीम सुबूर हिने उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयासह विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

इकरा शिक्षण संस्थेचे डॉ. अब्दुल करीम सालार, एजाज मलिक व इतर पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख, सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ताहिरीमचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित