चारचाकी वाहन चोर अटकेत; चोरीचा गून्हा कबूल, दरोड्याचे साहित्यही जप्त

चारचाकी वाहन चोर अटकेत; चोरीचा गून्हा कबूल, दरोड्याचे साहित्यही जप्त

महाराष्ट्र वाणी न्युज दि ३१ जुलै 

छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद (ग्रामीण) :- चारचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चोरीस गेलेली मारुती ईको कार (MH20 FP 3812) आणि युनिकॉन मोटरसायकल (MH20 EV 1753) हस्तगत करण्यात आली असून, दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी हत्यारांचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.

गुन्ह्याचा तपशील:

वैजापूर येथील फिर्यादी केतन रमया यांच्या चारचाकीची चोरी झाल्याने 28 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने सतत गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला.

दिनांक 31 जुलै रोजी खात्रीशीर माहितीच्या आधारे सावंगी बायपास येथे सापळा लावून सतनामसिंग ऊर्फ अजयसिंग चंदासिंग बावरे (वय 38, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, यापूर्वी चोरी केलेली मोटरसायकल शेतात लपवून ठेवल्याची माहितीही त्याने दिली.

जप्त मुद्देमाल:

मारुती ईको कार (MH20 FP 3812)

युनिकॉन मोटारसायकल (MH20 EV 1753)

दरोड्याचे साहित्य – कटवणी, टॉमी, लोखंडी कैची इ.

(एकूण किंमत अंदाजे ₹2,50,000/-)

सदर आरोपीस वैजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. विजयसिंह राजपूत, स.पो.नि. संतोष मिसळे व त्यांच्या पथकाने बजावली.

 अधिक बातम्यांसाठी भेट द्या – [महाराष्ट्र वाणी.com]