उद्या पडेगाव ते मिटमिटा रोडवर मनपाची अतिक्रमणविरोधी कारवाई; दोन्ही बाजूंनी ३० मीटर अंतरात हटवले जाणार अतिक्रमण

 महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २ जुलै :– पडेगाव ते मिटमिटा रस्त्याच्या दुतर्फा ३० मीटर अंतरावर मार्किंग करून, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका उद्या, ३ जुलैपासून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू करणार आहे. सकाळी ८ वाजेपासून ही मोहीम सुरू होणार असून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवली जाणार आहेत, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहूळे यांनी दिली.

महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेअंतर्गत दिनांक ३ जूनपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत देवळाई चौक ते महानुभाव आश्रम, केंब्रिज नाका ते मुकुंदवाडी, तसेच महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी मार्गावर ही कारवाई झाली आहे.

या मोहिमेच्या पुढील टप्प्यात आता पडेगाव ते मिटमिटा रोडवर कारवाई होणार असून, नागरीकांनी मनपाशी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 आपलं अतिक्रमण कुठे तर नाही ना? उद्याची मोहीम महत्त्वाची ठरू शकते!