स्मार्ट सिटी कार्यालयातून राहणार सर्व ठिकाणी नजर!स्मार्ट सिटी कार्यालयात होणार सर्व कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद) दि १३ महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ -२०२६ च्या निवडणुकी करिता दि.१५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.याची जय्यत तयारी मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
मां.आयुक्त तथा निवडणूक अधिकारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार एकूण ५३७ मतदान खोलीच्या आतमध्ये वेब कास्टिंग कॅमेरे बसविण्यात आले आहेत.तसेच एकूण ५३७ मतदान केंद्र खोली बाहेर सुद्धा वेब कास्टिंग कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
यात संवेदनशील व अती संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे.
या सर्व ठिकाणच्या एकूण १०७४ कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण स्मार्ट सिटी कार्यालय येथे होणार आहे.
स्मार्ट सिटी कार्यालय येथून या सर्व ठिकाणी नजर ठेवण्यात येणार आहे.सदर कामकाज मां.अतिरिक्त आयुक्त ०२ यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त ०६,शाखा प्रमुख ,सिस्टिम मॅनेजर, तसेच स्मार्ट सिटी चे प्रकल्प व्यवस्थापक यांच्या देखरेखीखाली होत आहे.