शाहिद आसिफ देशमुख यांना न्यायासाठी उद्या पारस येथे धरणे आंदोलन; लोहारा येथून बाइक रॅली, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र वाणी

लोहारा/ बाळापूर दि २४ :- ७ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या दुर्घटनेत शाहिद आसिफ देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी पारस येथील पॉवर हाऊस परिसरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

हे आंदोलन सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आंदोलनासाठी लोहारा येथून बाइक रॅली काढण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी १० वाजता लोहारा येथे अय्यूब भैया यांच्या घरासमोर सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येथून बाइक रॅलीच्या माध्यमातून आंदोलक पारस येथील पॉवर हाऊस परिसरात दाखल होतील. सहभागींसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

शाहिद आसिफ देशमुख यांच्या मृत्यूच्या घटनेची न्याय्य चौकशी करून संबंधितांना न्याय मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

“आज त्यांच्यासोबत घडले, उद्या आपल्यासोबतही घडू शकते,” असा संदेश देत आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.