‘मार्टि’ला अखेर गती! अल्पसंख्यांक आयुक्तांसोबत उच्चस्तरीय बैठक; कामे लवकर सुरू करण्याचे आश्वासन

‘मार्टि’ला अखेर गती! अल्पसंख्यांक आयुक्तांसोबत उच्चस्तरीय बैठक; कामे लवकर सुरू करण्याचे आश्वासन
‘मार्टि’ला अखेर गती! अल्पसंख्यांक आयुक्तांसोबत उच्चस्तरीय बैठक; कामे लवकर सुरू करण्याचे आश्वासन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २ :- 

मार्टि (MARTI) संस्थेला गती देण्याच्या दृष्टीने आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. मार्टि कमिटीचे मार्गदर्शक सत्तार खान जमालखान खान (निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा), अध्यक्ष पठाण अझर खान, उपाध्यक्ष सर आसिफ, तसेच सरताज साहेब (निवृत्त सहाय्यक शिक्षण अधिकारी), राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख कय्युम साहेब, बुलढाणा येथील अॅड. वसीम कुरेशी (सरचिटणीस, मार्टि कृती समिती) आणि इतर पदाधिकारी यांनी अल्पसंख्यांक आयुक्त श्रीमती प्रतिभा इंगळे (IAS) यांची भेट घेतली.

या बैठकीत मार्टि संस्थेच्या कामकाजाला गती देणे, अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रश्न, तसेच त्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली. विविध प्रलंबित मुद्दे, योजनांची अंमलबजावणी आणि संस्थेची कार्यक्षमता वाढविण्याबाबत प्रतिनिधींनी आपले मत मांडले.

अल्पसंख्यांक आयुक्त प्रतिभा इंगळे मॅडम यांनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी मार्टि संबंधित सर्व कामे लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी मार्टि कृती समितीच्या वतीने ईद मिलन आणि पारंपरिक शिरखुर्मा कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यामुळे बैठकीला सामाजिक सलोखा आणि सौहार्दाची जोड मिळाली.

 “मार्टि”ला मिळालेली ही नवी गती अल्पसंख्यांक समाजासाठी मोठा दिलासा ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.