इकरा शाहीन उर्दू हायस्कूलमध्ये ‘नशामुक्त युवा’ची शपथ

इकरा शाहीन उर्दू हायस्कूलमध्ये ‘नशामुक्त युवा’ची शपथ
इकरा शाहीन उर्दू हायस्कूलमध्ये ‘नशामुक्त युवा’ची शपथ

महाराष्ट्र वाणी

जळगाव दि ८ :- भारत सरकारच्या MY Bharat प्लॅटफॉर्मअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नशामुक्त युवा अभियान’च्या माध्यमातून मेहरूण येथील इकरा शाहीन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नशामुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी फरहान शेख सर यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या अमली व नशायुक्त पदार्थांपासून दूर राहण्यासोबतच नशेच्या दुष्परिणामांबाबत समाजात जनजागृती करण्याचा आणि निरोगी व नशामुक्त भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान देण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे शरीर, मन आणि सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. युवा ही देशाची सर्वात मोठी ताकद असून, त्यांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा तसेच विविध सकारात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाला बरकत सर, जावेद सर, मेहरुन्निसा मिस, कौसर सर, नूरजहाँ मिस, रिफत मिस यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नशेपासून दूर राहण्याचे तसेच समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन केले.

या उपक्रमातून ‘नशेला म्हणा नकार, निरोगी जीवनाला म्हणा होकार’ हा प्रभावी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल इकरा शाहीनचे प्राचार्य रियाज शाह सर, सुपरवायझर जाकिर शेख सर तसेच इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम साहेब आणि सचिव एजाज अहमद मलिक साहेब यांनी शिक्षक व स्टाफचे अभिनंदन केले.