अंभई जिल्हा परिषद शाळेत नूतन शालेय व्यवस्थापन समिती गठित; गोपाल मुंढे अध्यक्षपदी, चैत्राली साळवे उपाध्यक्षपदी बिनविरोध

अंभई जिल्हा परिषद शाळेत नूतन शालेय व्यवस्थापन समिती गठित; गोपाल मुंढे अध्यक्षपदी, चैत्राली साळवे उपाध्यक्षपदी बिनविरोध
अंभई जिल्हा परिषद शाळेत नूतन शालेय व्यवस्थापन समिती गठित; गोपाल मुंढे अध्यक्षपदी, चैत्राली साळवे उपाध्यक्षपदी बिनविरोध

महाराष्ट्र वाणी

अंभई ता. सिल्लोड दि ११ :- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंभई (मराठी) येथे आज नूतन शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. केंद्रीय मुख्याध्यापक श्री. गौरव पोमणे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीची नव्याने स्थापना करण्यात आली.

यावेळी समितीच्या अध्यक्षपदी गोपाल रामलाल मुंढे, तर उपाध्यक्षपदी चैत्राली सुभाष साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया शांततापूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक व भौतिक गरजा, शाळेतील पायाभूत सुविधा, स्वच्छता, विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची असते. या पार्श्वभूमीवर नूतन समितीच्या माध्यमातून शाळेच्या विकासाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष गोपाल रामलाल मुंढे व उपाध्यक्ष चैत्राली सुभाष साळवे यांचे उपस्थित मान्यवर, शिक्षक व पालकांकडून अभिनंदन करण्यात आले. तसेच नूतन समितीच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या निवड प्रक्रियेस शाळेतील शिक्षक, पालक तसेच संबंधित सदस्यांची उपस्थिती होती. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक, पालक आणि शालेय व्यवस्थापन समिती यांच्यात समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.