दलित–OBC–मायनॉरिटी–आदिवासी समाजासाठी लढ्याचा आवाज! संभाजीनगरात DOMA चे राज्यस्तरीय अधिवेशन, डॉ. उदीत राज करणार मार्गदर्शन

दलित–OBC–मायनॉरिटी–आदिवासी समाजासाठी लढ्याचा आवाज! संभाजीनगरात DOMA चे राज्यस्तरीय अधिवेशन, डॉ. उदीत राज करणार मार्गदर्शन

✒️ महाराष्ट्र वाणी

संभाजीनगर( औरंगाबाद) दि २० :– समाजातील दलित, OBC, मायनॉरिटी आणि आदिवासी बांधवांवर वेळोवेळी अन्याय व अत्याचार होत आहेत. सत्ता पक्षाकडून या अन्यायांना आळा बसत नाही, तर याचा फटका पुढील पिढ्यांना बसणार आहे, असा इशारा देत DOMA परिसंघाने सर्व घटकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

DOMA चे जिल्हाध्यक्ष बादशाह पटेल यांनी समाजातील जबाबदार व्यक्तींना उद्देशून आवाहन करताना सांगितले की, “अन्याय होत आहे हे माहिती असूनही आपण जर डोळे मिटून बसलो, तर आपली येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. समाजाच्या प्रश्नांवर बोलणे, अन्यायाविरोधात उभे राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, कोणताही बदल एका दिवसात घडत नाही. मशाल पेटवून, चालता चालता सोबत राहूनच मोठे कार्य घडवता येते. त्यामुळे एका विचाराने सुरुवात करून पुढच्या पिढीसाठी सुरक्षित भविष्य घडवण्याची वेळ आली आहे.

याच पार्श्वभूमीवर दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी गुलाब विश्व हॉल, TV सेंटर रोड, संभाजीनगर येथे DOMA चे राज्यस्तरीय अधिवेशन सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला DOMA चे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार डॉ. उदीत राज प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

या अधिवेशनासाठी दलित, OBC, मायनॉरिटी व आदिवासी समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बादशाह पटेल यांनी केले आहे.

✨ “आज उचललेलं पाऊल उद्याचं भविष्य घडवतं – चला, बदलासाठी एकत्र येऊया!”