इंदिरा गांधी पुण्यतिथी, सरदार पटेल जयंतीनिमित्त काँग्रेस सेवादलाचे रक्तदान शिबिर; २७ जणांचे रक्तदान!

इंदिरा गांधी पुण्यतिथी, सरदार पटेल जयंतीनिमित्त काँग्रेस सेवादलाचे रक्तदान शिबिर; २७ जणांचे रक्तदान!
इंदिरा गांधी पुण्यतिथी, सरदार पटेल जयंतीनिमित्त काँग्रेस सेवादलाचे रक्तदान शिबिर; २७ जणांचे रक्तदान!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २८ :- माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा व शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या सामाजिक उपक्रमात २७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा संदेश देत नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती करण्याचा उद्देश या शिबिरातून साधण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास बापू औताडे आणि शहर अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. शिबिराचे आयोजन सेवादलाचे शहर अध्यक्ष अल्ताफ पटेल आणि जिल्हा महिला अध्यक्ष प्रियंका खरात यांनी केले.

यावेळी प्रदेश सचिव सुरेश पवार, शहर उपाध्यक्ष अलमनूर पठाण, अर्जुन ठोंबरे, परमेश्वर पळसकर, शकील शहा, अनिल पळसकर, सागर मोरे, शेख इम्रान, संतोष एडके तसेच शासकीय रक्तपेढीचे संतोष कांबळे सर यांच्यासह काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक उपस्थित होते.

रक्तदान शिबिराला प्रतिसाद देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे, स्वयंसेवकांचे आणि सहकार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आयोजकांनी आभार मानले. सामाजिक सेवेचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित