पोलिस हक्क संघर्ष संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्षपदी शेख मोहम्मद इमरान! संस्थापक अध्यक्षा ॲड. जेबा अब्दुल कदीर शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

पोलिस हक्क संघर्ष संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्षपदी शेख मोहम्मद इमरान! संस्थापक अध्यक्षा ॲड. जेबा अब्दुल कदीर शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २२ (नजीमोद्दीन काजी) : पोलिस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहराध्यक्षपदी शेख मोहम्मद इमरान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ॲड. जेबा अब्दुल कदीर शेख यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त शहराध्यक्ष शेख मोहम्मद इमरान यांना संस्थापक अध्यक्षा ॲड. जेबा अब्दुल कदीर शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले आणि नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सचिव शेख अब्दुल कदीर, राजेंद्र लहाने, राज्य उपाध्यक्ष मुस्तफा खान आणि राज्य सचिव नजीमोद्दीन काजी (पत्रकार) यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेख मोहम्मद इमरान यांनी संघटनेची विचारधारा व उद्दिष्टे लक्षात घेऊन शहरात संघटनात्मक कामकाजाला अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. पोलिस कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित प्रश्न आणि समस्या योग्य त्या व्यासपीठावर मांडण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याची अपेक्षा यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात संघटनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, शेख मोहम्मद इमरान यांच्या नियुक्तीची माहिती मिळाल्यानंतर नागरिक, मित्रपरिवार, कुटुंबीय आणि शुभचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पोलिस हक्क संघर्ष संघटनेचे संघटनात्मक कार्य अधिक मजबूत करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे आणि सक्रियपणे कार्य करू,” असा विश्वास नवनियुक्त शहराध्यक्ष शेख मोहम्मद इमरान यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित