क्रांती चौकात केंद्र सरकारविरोधात एल्गार; आजाद समाज पार्टीसह विविध संघटनांचे सामूहिक आंदोलन
दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाला जाहीर पाठिंबा; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २० :- येथील क्रांती चौकात रविवारी आजाद समाज पार्टी (कांशीराम) आणि नागरी मूलभूत हक्क अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अरविंद कांबळे, आंबेडकरी नेते प्राचार्य सुनील वाकेकर, मराठवाडा अध्यक्ष शिवाजी वीर, मराठवाडा महासचिव काशिनाथ भांडेगावकर, मराठवाडा कार्याध्यक्ष तातेराव ससाणे, जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे, युवा जिल्हाध्यक्ष अनामी मोरे, शहराध्यक्ष शेख जावेद, महिला आघाडी शहराध्यक्ष रेखा राजभोज, जिल्हा उपाध्यक्ष राजू निकाळजे, साहेबराव दाभाडे, विजय भिमसाने, पश्चिम शहराध्यक्ष (अल्पसंख्याक) नवाब पटेल, जिल्हा महासचिव राजू गवारगुर व शरद थोरात, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष शेख फिरोज, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष शेख जुबेर, शहर उपाध्यक्ष शेख अल्ताफ व सारिका जाधव, शहर सचिव अमोल सोनवणे, पश्चिम उपाध्यक्ष महेंद्र मिसाळ, मध्य विधानसभा अध्यक्ष शेख समीर, गंगापूर युवा तालुका अध्यक्ष निलेश गजभारे, रावसाहेब खरात, संतोष इंगळे, प्रभाग अध्यक्ष सुरेश जगधने, वार्ड अध्यक्ष अजय सोनवणे, अक्षय बनकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यानंतर क्रांती चौकात विविध विद्यार्थी संघटना आणि वकील संघटनांनीही आंदोलन केले. पुढे आजाद समाज पार्टी, नागरी मूलभूत हक्क अभियान, विद्यार्थी संघटना आणि वकील संघटनांनी एकत्र येत सामूहिक आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि दिल्लीतील आंदोलनाला एकजुटीने पाठिंबा व्यक्त करण्यात आला.