“इद्रिस मुलतानी यांच्या पाठपुराव्याला यश! १५ गावांचा अंधार संपणार – ८ कोटींच्या विज प्रकल्पाला मंजुरी”

“इद्रिस मुलतानी यांच्या पाठपुराव्याला यश! १५ गावांचा अंधार संपणार – ८ कोटींच्या विज प्रकल्पाला मंजुरी”

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २४ :- जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळदबारा व जामठी परिसरातील तब्बल १५ गावांचा विजेचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्तक्षेपामुळे हा महत्त्वाचा निर्णय झाला आहे.

या भागातील वीज पुरवठा व्यवस्थेत मोठी विसंगती होती. सावळदबारा परिसरातील १२ गावांना बुलढाणा जिल्ह्यातून, तर जामठी परिसरातील ४ गावांना जळगाव जिल्ह्यातून वीज पुरवठा होत होता. मात्र, वीज बिल वसुली छत्रपती संभाजीनगर महावितरण विभागाकडून केली जात होती. या विसंगतीमुळे नागरिकांना वारंवार खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत होता.

या गंभीर समस्येकडे भाजप अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी लक्ष वेधत, तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री यांनी याची दखल घेत तातडीने कार्यवाही केली.

या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून ४२ किलोमीटर लांबीच्या नवीन विजवाहिनी प्रकल्पासाठी तब्बल ८ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत फर्दापूर ते सावळदबारा दरम्यान १३२ के.व्ही. ते ३३ के.व्ही. नवीन मुख्य लाईन टाकण्यात येणार आहे. या कामामुळे संबंधित १५ गावांना स्थिर आणि अखंड वीजपुरवठा मिळणार आहे.

या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, मंत्री अतुल सावे तसेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

👉 “आता अंधार हटणार, विकासाची वीज गावोगावी झळकणार!”