राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त घाटी रुग्णालयात समाजसेवेचा उपक्रम; गरजू रुग्णांना वॉकर व वॉकिंग स्टिकचे वाटप
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २ :- देशाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 19 शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आमेर अब्दुल सलीम यांच्या वतीने घाटी रुग्णालयात गरजू रुग्णांसाठी विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत चालण्यात अडचण असलेल्या रुग्णांना मदत व्हावी या उद्देशाने वॉकर आणि वॉकिंग स्टिकचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजू घटकांना मदत करणे, जनहितासाठी कार्य करणे आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहणे हा संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी राहुल गांधी यांच्या विचारांप्रमाणे समाजसेवा आणि जनहिताचा संकल्प अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम भैय्या, माजी अध्यक्ष इब्राहिम पठाण, महाराष्ट्र प्रदेश सचिव युवा काँग्रेस इरफान इब्राहिम पठाण, राजीव गांधी पंचायत राजचे महाराष्ट्र महासचिव मोहम्मद जाकीर भाई, पवन डोंगरे, इंजि. विशाल बन्सवाल, मोईन कुरेशी, आबेद हुसेन, शफीक शहा, अजय डिडोर, गुरमीत गिल, शोएब अब्दुल्ला शेख, फैझ शेख, सुफियान पठाण, योगेश थोरात, साहेबराव बनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वाचत रहा महाराष्ट्र वाणी — तुमच्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची बातमी, सर्वात आधी!