NEET (UG) 2026 मध्ये सोहेल खान पठाण यांचे घवघवीत यश; 628 गुणांसह AIR 3689, सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि १७ :- मार्टीचे सर्वेसर्वा तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड. अझर पठाण यांचे सुपुत्र सोहेल खान अझर खान पठाण यांनी NEET (UG) 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोहेल खान यांनी 720 पैकी 628 गुण मिळवत 99.8093400 पर्सेंटाइल प्राप्त केला आहे. तसेच त्यांनी अखिल भारतीय क्रमवारीत (AIR) 3689 वा क्रमांक पटकावला असून General-EWS प्रवर्गात 346 वा क्रमांक मिळवला आहे. स्पर्धात्मक परीक्षेत मिळवलेले हे यश त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे, जिद्दीचे आणि अभ्यासातील समर्पणाचे फलित मानले जात आहे.
सोहेल खान यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह मित्रपरिवार, नातेवाईक आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भविष्यात ते वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी डॉक्टर बनून समाजसेवेचे कार्य करतील, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
यावेळी ॲड. अझर पठाण यांच्या कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, सोहेल खान यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वजण शुभेच्छा व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्र वाणी परिवाराकडूनही सोहेल खान अझर खान पठाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या यशाने अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळो, हीच सदिच्छा.