LCB ची यशस्वी कारवाई – चोरीला गेलेली बुलेट हस्तगत, आरोपी अटकेत
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ११ जुलै :- गंगापूर शहरातून बुलेट मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुददेशवाडगाव फाटा येथे सापळा रचून अटक केली.
दिनांक २०/०५/२०२५ रोजी गंगापूर शहरातील लासूर नाका येथून पांढऱ्या रंगाची बुलेट चोरीस गेली होती. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९०/२०२५, भादंवि कलम ३७९ नुसार नोंद करण्यात आली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना, दिनांक ११ जुलै २०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक पवन इंगळे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, गंगापूर–वैजापूर रोडवर मुददेशवाडगाव फाट्याजवळ अंधारात दोन इसम बुलेटसह थांबले आहेत.
पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपल्या नावांची ओळख १) समाधान देविदास राठोड (रा. करंजी, ता. कोपरगाव, सध्या मु. भिंगार, अहिल्यानगर) आणि २) अभय बाळासाहेब कडनर (वय २१, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) अशी दिली. त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली बुलेट ही दिनांक २० मे रोजीच गंगापूर शहरातून चोरीला गेली होती, असे त्यांनी कबूल केले.
अधिक तपासणीअंती उघड झाले की, आरोपींवर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर दोघांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी गंगापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह राजपूत, सपोनि पवन इंगळे, पोहेकॉ वाल्मीक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ व पो.शि. महेश बिरुटे यांच्या पथकाने पार पाडली.