स्वराज्य शक्ती सेना महिला आघाडीच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मीताई गायकवाड यांची नियुक्ती

स्वराज्य शक्ती सेना महिला आघाडीच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मीताई गायकवाड यांची नियुक्ती

महाराष्ट्र वाणी

नाशिक (विशेष प्रतिनिधी) दि २० :- स्वराज्य शक्ती सेना महिला आघाडीच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सौ. लक्ष्मीताई गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्य आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम केल्यामुळे त्यांच्या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समितीच्या नांदगाव तालुका अध्यक्षा म्हणून कार्यरत असलेल्या सौ. लक्ष्मीताई गायकवाड यांची ही निवड पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. करूणाताई धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. शेख नुझहत आरा शेख अहमद यांच्या हस्ते पडेगाव येथील पक्ष जनसंपर्क कार्यालयात नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रियाजखान पठाण, रहीम पटेल, जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, मोतीभाऊ वाघ, रंगनाथ सोनवणे, बाळू जानराव, अ. रशीद पटेल, राशीद शेख, मोज्जम शेख, अकील शेख, मोबीन मुलतानी, सैय्यद जाहेदअली, कलीम मुलतानी, समीर सैय्यद, कव्वाल सलीम ताज, अरबाज मोमीन, हुसेन हाजीबाबा कुरेशी, अन्सार दस्तगीर शेख, जाकीरबाबा शेख, पिर मोहम्मद शेख, जाहेद कुरेशी, अ. कादिर कुरेशी, नफिस अन्सारी, हाफिज मुजाहिद अन्सारी, आदिल अन्सारी, अब्रार पटेल आणि मुसा पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

“सामाजिक कार्यातून नेतृत्वाची नवी जबाबदारी; लक्ष्मीताई गायकवाड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!”