औषधी वनस्पतींच्या ज्ञानाची विद्यार्थ्यांकडून उलगडणारी सफर; ‘हर्बल होम रेमेडीज’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

औषधी वनस्पतींच्या ज्ञानाची विद्यार्थ्यांकडून उलगडणारी सफर; ‘हर्बल होम रेमेडीज’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
औषधी वनस्पतींच्या ज्ञानाची विद्यार्थ्यांकडून उलगडणारी सफर; ‘हर्बल होम रेमेडीज’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र वाणी

जळगाव, दि. १० :- एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरूण, जळगाव येथील वनस्पतिशास्त्र विभागाच्या वतीने ‘हर्बल होम रेमेडीज’ अर्थात औषधी वनस्पतींपासून घरगुती उपचार या विषयावर माहितीपूर्ण व शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींचे महत्त्व, त्यांचे पारंपरिक उपयोग आणि घरगुती उपचारपद्धती याबाबत जनजागृती करणे हा या प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश होता.

प्रदर्शनाचे अध्यक्षस्थान डॉ. वैकार शेख यांनी भूषविले, तर परीक्षक म्हणून डॉ. युसूफ पटेल यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध औषधी वनस्पती व हर्बल उपचारांची पाहणी करून परीक्षण केले.

या उपक्रमात एकूण ३१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध औषधी वनस्पती, त्यांचे औषधी गुणधर्म, पारंपरिक उपयोग तसेच घरगुती उपचारपद्धती यांची माहिती आकर्षक पद्धतीने सादर केली. तज्ज्ञ, प्राध्यापक आणि सहकारी विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींच्या उपयोगांविषयी माहिती देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या सादरीकरणातून विषयाचे महत्त्व स्पष्ट केले.

या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना एथ्नोबॉटनी (पारंपरिक व स्थानिक वनस्पती ज्ञान), औषधी वनस्पती आणि पारंपरिक उपचारपद्धती यांचा प्रत्यक्ष अनुभवातून अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच त्यांच्या संवादकौशल्य, सादरीकरण कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासालाही चालना मिळाली.

प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. तनवीर खान, डॉ. फिरदोस, प्रा. उमर पठाण आणि प्रा. प्रवीण घाडगे यांनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले.

महाविद्यालयातील प्राध्यापक, तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमातून औषधी वनस्पतींचे महत्त्व, पारंपरिक वनस्पती ज्ञानाचे संवर्धन तसेच नैसर्गिक आणि शाश्वत आरोग्यविषयक उपायांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला.