वाढदिवसानिमित्त नानाभाऊ पटोले यांना शेख युसूफ आणि सहकाऱ्यांकडून शुभेच्छा

वाढदिवसानिमित्त नानाभाऊ पटोले यांना शेख युसूफ आणि सहकाऱ्यांकडून शुभेच्छा
वाढदिवसानिमित्त नानाभाऊ पटोले यांना शेख युसूफ आणि सहकाऱ्यांकडून शुभेच्छा

महाराष्ट्र वाणी न्युज 

साकोली (जि. भंडारा) दि८ जून :- साकोली येथील निवासस्थानी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान आमदार नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष शेख युसूफ भैय्या यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व सत्कार केला.

यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. निलेश अंबेवाडीकर, सरचिटणीस अनिस पटेल, मानवाधिकार विभागाचे अध्यक्ष शेख कैसर बाबा, तसेच काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते सय्यद फयाजुद्दीन ई. हे उपस्थित होते.

या भेटीदरम्यान काँग्रेसच्या भविष्यातील दिशा, संघटनात्मक बांधणी आणि पक्ष मजबूत करण्यासंदर्भातील विविध विषयांवरही चर्चा झाली. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी आमदार पटोलेंना हार्दिक शुभेच्छा देत त्यांना आरोग्यदायी, यशस्वी व दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना केली.

या औपचारिक भेटीने औरंगाबाद व विदर्भातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.