महाराष्ट्रातील 1.87 कोटी मतदार ‘अनकलेक्टेबल’; 33.94 लाख मृत, 71.95 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित

महाराष्ट्रातील 1.87 कोटी मतदार ‘अनकलेक्टेबल’; 33.94 लाख मृत, 71.95 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित
महाराष्ट्रातील 1.87 कोटी मतदार ‘अनकलेक्टेबल’; 33.94 लाख मृत, 71.95 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित

महाराष्ट्र वाणी

मुंबई, दि. १३ :- महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाला वेग आला असून, राज्यातील तब्बल 1 कोटी 87 लाख 56 हजार 231 मतदारांचे गणना प्रपत्र अद्याप जमा झालेले नाही. या मतदारांना ‘Uncollectable EF’ या प्रवर्गात नोंदविण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (BLO) घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेची अंतिम मुदत 17 ऑगस्ट 2026 आहे.

राज्यात एकूण 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदार असून, त्यापैकी 7 कोटी 62 लाख 99 हजार 360 मतदारांचे (77.97%) गणना प्रपत्र भरून स्वाक्षरीसह प्राप्त झाले आहे.

दरम्यान, प्रपत्र जमा न झालेल्या 1.87 कोटी मतदारांमध्ये 63 लाख 61 हजार 113 मतदार सापडू न शकलेले किंवा गैरहजर, तर 71 लाख 95 हजार 388 मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. 33 लाख 94 हजार 53 मतदार मृत, 16 लाख 62 हजार 121 मतदार अन्यत्र नोंदणी केलेले अथवा दुबार, तर 1 लाख 43 हजार 556 मतदार इतर प्रवर्गात आहेत.

एकूण मतदारांपैकी 9 कोटी 50 लाख 55 हजार 591 (97.14%) मतदारांबाबतची कार्यवाही पूर्ण झाली असून, उर्वरित 27 लाख 98 हजार 458 (2.86%) मतदारांबाबतची कार्यवाही बाकी आहे.

‘Uncollectable EF’ प्रवर्गातील मतदारांच्या याद्या संबंधित BLO मार्फत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना (BLA) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळांवरही या याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

या यादीतील मतदारांच्या वास्तव्याबाबत मतदार किंवा BLA प्रतिनिधींनी संबंधित BLO यांना माहिती दिल्यास प्रत्यक्ष पडताळणी करून 17 ऑगस्टपर्यंत त्यांचे गणना प्रपत्र भरून घेता येणार आहे. याबाबत 12 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सविस्तर माहिती देण्यात आली आहे.