‘युथ मूव्हमेंट’चा मानवतेचा संदेश! ईद-ए-मिलादनिमित्त सिल्लोडमध्ये भव्य रक्तदान महाअभियान

‘युथ मूव्हमेंट’चा मानवतेचा संदेश! ईद-ए-मिलादनिमित्त सिल्लोडमध्ये भव्य रक्तदान महाअभियान
‘युथ मूव्हमेंट’चा मानवतेचा संदेश! ईद-ए-मिलादनिमित्त सिल्लोडमध्ये भव्य रक्तदान महाअभियान

महाराष्ट्र वाणी

सिल्लोड दि २६ :- ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पवित्र पर्वानिमित्त युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्रच्या वतीने राज्यभर रक्तदान महाअभियान राबविण्यात आले. या अभियानाचा एक भाग म्हणून सिल्लोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. तसेच युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्रच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत या स्तुत्य उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

‘रक्तदान – इबादत भी, जिंदगी भी!’ या संदेशातून मानवतेची सेवा करण्याचा प्रेरणादायी संदेश या अभियानातून देण्यात आला. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी रक्तदान हे जीवनदान ठरू शकते. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

धार्मिक पर्वाला सामाजिक सेवेची जोड देत युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्रने राबविलेल्या या उपक्रमातून मानवतेचा आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. सिल्लोडमधील रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन करण्यात आले.