शेख इरफान शेख अफसर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
महाराष्ट्र वाणी
मुंबई/ CSN दि १८ :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक विभागाच्या औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्षपदी शेख इरफान शेख अफसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अफझल फारूक व प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय, धोरणे आणि विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शेख इरफान शेख अफसर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विशेषतः अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या प्रश्नांना व विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत संघटनात्मक पातळीवर काम करण्याची अपेक्षा पक्षाने व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारांनुसार पुढील काळात अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य अल्पसंख्याकांच्या विकासासाठी भरीव कार्य करावे तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे, असे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
शेख इरफान शेख अफसर यांच्या नियुक्तीमुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाला संघटनात्मक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी काळात शहरातील विविध भागांमध्ये पक्षाची विचारधारा आणि संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
या नियुक्तीची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहंदी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश महासचिव तथा अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी आमदार रोहित पवार आणि प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांना माहितीस्तव सादर करण्यात आली आहे.
दरम्यान, नियुक्तीनंतर शेख इरफान शेख अफसर यांचे पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक विभागाची शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.