मोटारसायकल चोरांची टोळी गजाआड – २.९५ लाखांची ७ गाड्या जप्त

बजाज पल्सर, हिरो फँशन, होंडा शाईन, अॅक्टीवा, हिरो होंडा सीडी डॉन, एचएफ डिलक्स अशा विविध कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश

मोटारसायकल चोरांची टोळी गजाआड – २.९५ लाखांची ७ गाड्या जप्त

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ८ जुलै :– शहरात मोटारसायकल चोरी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुकुंदवाडी पोलीसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कामगिरी केली आहे. झेंडा चौक परिसरात चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी आलेल्या दोन अट्टल चोरांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण २.९५ लाख रुपये किमतीच्या ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या आदेशावरून, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले आणि पोउपनि शिवाजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकातील पोलीस कर्मचारी पोह/१४३३ गणेश वैराळकर यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

सापळा रचून आरोपी १) सुमीत सुरेश उघडे (१९, रा. सम्यक बौद्ध विहाराजवळ) आणि २) राज गंमतीदास काळे (२०, रा. राजनगर मुकुंदवाडी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलची चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

तपासादरम्यान या दोघांनी आणखी सहा मोटारसायकली लपवून ठेवल्याचे उघड झाले. त्या ठिकाणी छापा टाकून सर्व मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. जप्त वाहनांमध्ये बजाज पल्सर, हिरो फँशन, होंडा शाईन, अॅक्टीवा, हिरो होंडा सीडी डॉन, एचएफ डिलक्स अशा विविध कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे.

जप्त गाड्यांवर आधारित ४ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींवर भादंवि कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक गणेश वैराळकर करत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोउपआयुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

 शहरात चोरी करणार्‍यांसाठी हा मोठा धक्का ठरला असून, पोलीस दलाच्या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.