मसिआ महिला सेलच्या 'इन्स्टॉलेशन सेरेमनी २०२५-२६' मध्ये महिलांच्या सशक्ततेचा जागर

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १० जून :– दिनांक ०९ जून २०२५ रोजी "मराठवाडा लघु उद्योग आणि कृषी असोसिएशन (MASSIA) Women Entrepreneurship Development Cell" अंतर्गत एमआयडीसी वाळूज येथील अनिल विश्वासराव चव्हाण सभागृहात "Installation Ceremony 2025-2026" कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून श्री. अंकित सर (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, तसेच श्रीमती अन्नपूर्णा सिंह (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अर्जुन गायकवाड होते. तसेच MWEDC च्या २०२४-२५ च्या कन्व्हेनर सौ. राजश्री कुलकर्णी यांचीही उपस्थिती लाभली.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित सर यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा देत मसिआ महिला सेलद्वारे होत असलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. महिलांमध्ये उपजत नेतृत्वगुण असतात आणि त्या उद्योगविश्वातही आपल्या भूमिकेने महत्त्व निर्माण करत आहेत, असे सांगत त्यांनी महिला सेलला आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांनी महिलांना आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी ‘सेफ्टी कोड’ आणि ‘सेफ्टी मॅप’ बाबत माहिती देत प्रत्येक उद्योग संस्थेत हे उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. महिलांमध्ये असलेली शक्ती, सहनशीलता आणि आत्मनिर्भरतेवर भर देत त्यांनी स्वबळावर ओळख निर्माण करण्याचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमाद्वारे नव्या कार्यकारिणीची स्थापना झाली असून, MASSIA चा महिला सेल महिला उद्योजिकांच्या सशक्तीकरणासाठी प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. कार्यक्रमाची सांगता उपस्थित सर्व मान्यवरांनी नव्या टीमला शुभेच्छा देत केली.