"जनतेने दिलेल्या विश्वासाला जागत वंचित बहुजन आघाडी; भीमनगर, निसर्ग कॉलनीत ‘जनतेसाठी पाणी सेवा’ सुरू"

"जनतेने दिलेल्या विश्वासाला जागत वंचित बहुजन आघाडी; भीमनगर, निसर्ग कॉलनीत ‘जनतेसाठी पाणी सेवा’ सुरू"
"जनतेने दिलेल्या विश्वासाला जागत वंचित बहुजन आघाडी; भीमनगर, निसर्ग कॉलनीत ‘जनतेसाठी पाणी सेवा’ सुरू"

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १३ :- शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, स्वयंपाक तसेच स्वच्छतेच्या गरजांसाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार विनंत्या करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेत गरजू नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्र. ३ च्या नगरसेविका करुणा मेघानंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर, निसर्ग कॉलनी, संविधान चौक, लुंबिनी चौक, विश्रांती चौक आदी भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

जनतेने नगरसेवक म्हणून दिलेल्या संधीचे ऋण फेडण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहण्याचा निर्धार करुणा जाधव यांनी व्यक्त केला.

वाचत राहा महाराष्ट्र वाणी — आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींची विश्वासार्ह माहिती!