इम्तियाज जलील यांच्या हस्ते AIMIM नगरसेवक अशोक हिवराळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन; जनसेवेला गती देण्याचा निर्धार

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २२ :- AIMIM चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक अशोक (भाऊ) हिवराळे यांच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना इम्तियाज जलील यांनी जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले. स्थानिक पातळीवर पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाची महत्त्वाची भूमिका राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरसेवक अशोक (भाऊ) हिवराळे यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी हे कार्यालय कायम खुले राहील, असे सांगितले. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, नागरी सुविधा, विकासकामांबाबतच्या तक्रारी आणि विविध शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी इम्तियाज जलील यांचे स्वागत केले. नव्या जनसंपर्क कार्यालयामुळे प्रभागातील नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि त्यावर त्वरित पाठपुरावा होण्यासाठी एक प्रभावी केंद्र उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.