अंभई ग्रामपंचायतीत क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

अंभई ग्रामपंचायतीत क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
अंभई ग्रामपंचायतीत क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र वाणी

अंभई दि ११ :- ग्रामपंचायत कार्यालय अंभई येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि शेतकरी हितासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा फुले यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलिस पाटील दगडु मैंद यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, त्यांच्या कार्यातून समाजाला आजही दिशा मिळत असल्याचे सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य, गावातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या कार्याला वंदन करत त्यांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प केला.

👉 “महात्मा फुले यांचे विचार जपले, तरच समाजात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडेल!”