सेंट अँन्ड्रय़ूज हायस्कूलमध्ये प्रवेशोत्सव जल्लोषात; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि शिक्षकांना ब्लेझर वाटप

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे, दि. १६ जून :- पुणे कॅम्प येथील सेंट अँन्ड्रय़ूज गर्ल्स हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थिनींना स्वागत करत सर्व विद्यार्थिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी विद्यार्थिनींना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे शाळेतील सर्व शिक्षकांना शाळेच्या लोगो असलेल्या ब्लेझरचे वाटप, जे शिवसेना पुणे शहर संपर्कप्रमुख सुदर्शनाताई त्रिगुणाईत यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना (शिंदे गट) शिक्षक-शिक्षकेतर पुणे जिल्हा प्रमुख अनिल गडकरी, उपशहर प्रमुख विकास भांबुरे, सनी स्पोर्ट्सचे संचालक जयंत भोसले, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना साठे, शिक्षिका मारिया देठे, सीमा कांबळे, मेघा माहीनकर, आणि कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेकडे नेण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.