दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय कौतुकास्पद : पांडुरंग तागंडे पाटील

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय कौतुकास्पद : पांडुरंग तागंडे पाटील
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय कौतुकास्पद : पांडुरंग तागंडे पाटील

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :- येथील संबोधी स्पर्धा परीक्षा केंद्र व संबोधी अकादमीच्या ८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तागंडे पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी अकादमीच्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वर्धापन दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय अकादमीने घेतला. हा निर्णय सामाजिक भान जपणारा असून, त्याचे पांडुरंग तागंडे पाटील यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबीरे होते. तागंडे पाटील यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. संबोधी अकादमीच्या उभारणीच्या सुरुवातीच्या काळातील अडचणी, संघर्ष आणि त्यानंतर संस्थेने केलेली यशस्वी वाटचाल याबाबत डॉ. हत्तीअंबीरे यांनी उपस्थितांसमोर माहिती दिली.

गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत संबोधी अकादमीने स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले असून, या संस्थेतून महाराष्ट्राला अनेक अभ्यासू व कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकादमीचा प्रवास प्रेरणादायी असल्याचेही पांडुरंग तागंडे पाटील यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी संबोधी अकादमीतून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भविष्यात या संस्थेतून घडणारे अधिकारी महाराष्ट्राच्या सेवेत मोलाचे योगदान देतील, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, अकादमीचे पदाधिकारी, शिक्षक तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज