पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २६३ पत्रकारांची तपासणी

पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २६३ पत्रकारांची तपासणी
पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २६३ पत्रकारांची तपासणी

महाराष्ट्र वाणी 

 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २३ :- समाजातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत जनहितासाठी कार्यरत असलेल्या पत्रकारांनी आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल २६३ पत्रकारांनी आरोग्य तपासणी करून घेतली.

जिल्हा माहिती कार्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले.

यावेळी उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन दयानंद पाटील, सहआयुक्त नगरपरिषद प्रशासन सौरभ जोशी, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष माधव सावरगावे, सहायक संचालक सुरेश पाटील आणि माहिती अधिकारी संजीवनी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

पत्रकारांचे दैनंदिन जीवन धावपळीचे असून विविध सामाजिक प्रश्नांच्या पाठपुराव्यात अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन पत्रकारांनी नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत जागरूक राहावे, या उद्देशाने उपसंचालक प्रवीण टाके आणि जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांच्या सहकार्याने पत्रकारांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तसेच तपासणीनंतर आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.

या शिबिरात जिल्हा मराठी पत्रकार संघ, मालक-संपादक महासंघ, व्हॉईस ऑफ मीडिया, व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग, एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशन, उर्दू प्रेस रिपोर्टर्स असोसिएशन यांसह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.

पत्रकार बांधव आणि भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आरोग्य तपासणी शिबिराला व्यापक प्रतिसाद मिळाला.

SEO हेडलाईन: पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २६३ पत्रकारांची तपासणी