संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त काँग्रेस कमिटीचे अभिवादन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १५ :- शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने थोर समाजसुधारक व बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पक्ष कार्यालय गांधी भवन, शहागंज येथे अभिवादन करण्यात आले.
हा कार्यक्रम खासदार डॉ. कल्याण काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
यावेळी संत सेवालाल महाराजांच्या सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांनी समाजात समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
युवकांनी संत सेवालाल महाराजांच्या विचारांचा अभ्यास करून सामाजिक परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस संदीप डव्हळे पाटील, ॲड. सय्यद अक्रम, इब्राहिम पठाण, जगन्नाथ काळे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संत सेवालाल महाराजांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देतात!