गोलवाडी विद्यार्थ्यांसाठी दिलासा! औरंगपुरा-गोलवाडी शालेय बस सेवा सुरु; ग्रामस्थांकडून चालक-वाहकांचा सत्कार

गोलवाडी विद्यार्थ्यांसाठी दिलासा! औरंगपुरा-गोलवाडी शालेय बस सेवा सुरु; ग्रामस्थांकडून चालक-वाहकांचा सत्कार
गोलवाडी विद्यार्थ्यांसाठी दिलासा! औरंगपुरा-गोलवाडी शालेय बस सेवा सुरु; ग्रामस्थांकडून चालक-वाहकांचा सत्कार

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. 20 जून :- स्मार्ट सिटी बस विभागाच्या वतीने औरंगपुरा ते गोलवाडी गाव मार्गे होलीक्रॉस मराठी शाळा, लिटल फ्लॉवर हायस्कूल, घासमंडी, छावणी मार्गावर नवीन शालेय बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेचा लाभ सुमारे ५० विद्यार्थ्यांना थेट घरून शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी होणार आहे.

ही सेवा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत यांच्या सूचनेनुसार सामाजिक बांधिलकीच्या तत्त्वावर सुरू करण्यात आली असून, शहर बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक संजय सुपेकर यांनी याची माहिती दिली.

या उपक्रमांतर्गत शुक्रवारी स्मार्ट सिटी बस विभागातर्फे शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रवास पासेसचे वितरण करण्यात आले. यावेळी सहायक व्यवस्थापक प्रमोद देशमुख, बंडू वाघ, मिडिया विश्लेषक अर्पिता शरद, चलो अ‍ॅपचे शुभम निंबलवार तसेच शाळेतील शिक्षक दादाराव गायकवाड, कृष्णा शिंदे, चेतना तायडे, मनीषा कोळी, सुरेखा मोटे, दिव्या चव्हाण, चैताली तपकिरे, तरन्नू बानो, तुषार चव्हाण, गजानन डफळ, संदीप कळंबे, स्वप्निल लोखंडे, आयेशा बेगम आणि मुख्याध्यापिका सीमा बेगम उपस्थित होते.

बस गोलवाडी येथे पोहोचताच गावच्या सरपंच भारतीताई रमेश कणिसे व ग्रामस्थांनी बस चालक आणि वाहक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यासोबतच श्री. तिरछे, श्री. कसारे, श्री. सकट, श्री. माळी यांनीही मान्यवरांचा सत्कार केला.

जि.प. कन्या प्रशाला औरंगपुरा येथील शिक्षक दादाराव गायकवाड यांनी शाळेच्या वतीने बस चालक व वाहकांचा सत्कार केला. या नवीन बस सेवेबद्दल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शालेय शिक्षणासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.