ऑल इंडिया उल्मा बोर्ड मुतवल्ली विंगची नवीन कार्यकारिणी जाहीर! सैय्यद सादात दरगाह परिसरात कार्यक्रम; सामाजिक कार्य व वक्फ जमीन बचावाचा निर्धार

ऑल इंडिया उल्मा बोर्ड मुतवल्ली विंगची नवीन कार्यकारिणी जाहीर! सैय्यद सादात दरगाह परिसरात कार्यक्रम; सामाजिक कार्य व वक्फ जमीन बचावाचा निर्धार
ऑल इंडिया उल्मा बोर्ड मुतवल्ली विंगची नवीन कार्यकारिणी जाहीर! सैय्यद सादात दरगाह परिसरात कार्यक्रम; सामाजिक कार्य व वक्फ जमीन बचावाचा निर्धार

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १८ :- ऑल इंडिया उल्मा बोर्ड मुतवल्ली विंगच्या औरंगाबाद शहर व जिल्हा कार्यकारिणीची घोषणा रविवारी (दि. १७ मे) दुपारी ३ वाजता सैय्यद सादात दरगाह परिसरातील शाही मशिदीजवळील संपर्क कार्यालयात करण्यात आली. हा कार्यक्रम मुतवल्ली विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष जनाब शेख फैसल इकबाल मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी अजंठ्याचे पीर साहेब शेख सांडू अब्दुल मजीद साहेब, अकबर पीर साहेब तसेच शेख जाकीर बाबा यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सैय्यद सादात दरगाह येथे फुलांची चादर चढवून दुरूद शरीफ पठण करण्यात आले व फातिहा अदा करण्यात आली.

यानंतर शेख फैसल मुजावर यांनी उल्मा बोर्डचे महासचिव आलम बुनई हस्नी यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र देत रवी नारायणराव खिल्लारे यांची उल्मा बोर्ड सूफी संत विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांचा सत्कार केला.

तसेच मुतवल्ली विंगच्या मराठवाडा अध्यक्षा शकीला नाजे खां पठाण, औरंगाबाद शहराध्यक्ष उस्मान हबीब खान आणि शहर महिला अध्यक्षा सीमा मांडवीया यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनाही नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये औरंगाबाद शहर महिला कार्यकारी अध्यक्षा नुजत आरा अहमद शेख, जिल्हाध्यक्ष पीर साहेब अकबर शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शाकेर चिश्ती, जिल्हा उपाध्यक्ष शेख जाकीर बाबा, शहर सचिव शेख अन्वर, सईदा शेख आपा, रहेमुनिस्सा बेगम, अहमदनगर शहर महिला अध्यक्षा रिजवाना शेख तसेच अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष रशीद गुलाम शेख यांचा समावेश आहे.

यावेळी शकीला नाजे खां पठाण यांनी सांगितले की, उल्मा बोर्डने ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे त्यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करावे, गरीबांना मदत करावी आणि वक्फ जमिनी वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करावेत.

या कार्यक्रमाला शहर उपाध्यक्ष अहमद अली खान, शेख अजीज ईसा, जाकीर बाबा, डॉ. शेख शेरू भाई येवला, डॉ. हनीफ पठाण (बीड), शेख अन्वर, हबीब खान, खालिद पठाण, सईदा शेख आपा यांच्यासह उल्मा बोर्डचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“समाजहित, ऐक्य आणि वक्फ संरक्षणाचा संदेश देत उल्मा बोर्डाची नवीन टीम आता सक्रिय झाली आहे.”