हलाखीतून उंच भरारी! सुगावच्या मगदुम फारुख शेख यांची महाराष्ट्र पोलिस दलात दमदार एंट्री

हलाखीतून उंच भरारी! सुगावच्या मगदुम फारुख शेख यांची महाराष्ट्र पोलिस दलात दमदार एंट्री

महाराष्ट्र वाणी

अंबाजोगाई, बिड (वा.) दि ७ :- मु. पो. सुगाव (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील रहिवासी मगदुम फारुख शेख यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र पोलिस दलात (पुणे शहर) यशस्वी निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मगदुम यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत साधारण. वडील सालगडी म्हणून मजुरी करतात, तर आई शेतात कष्ट करून कुटुंबाला हातभार लावते. अशा कठीण परिस्थितीतही मगदुम यांनी शिक्षणाची कास धरत आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवले.

शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली. पोलिस भरतीसाठी त्यांनी दिवस-रात्र एक करत कठोर मेहनत घेतली. आर्थिक अडचणी, प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक संकटांवर मात करत त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले.

मगदुम यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्यावरचा विश्वास सार्थ ठरला असून, सुगाव गावातही त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जात आहे. अनेकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 “गरिबी अडथळा नाही, जिद्द असेल तर यश नक्की मिळते,” हे मगदुम यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.