हर्सुलमध्ये शोककळा: व्यापारी अनिस अनवर पटेल यांचे हृदयविकाराने निधन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.१८ :- शहरातील हर्सुल परिसरातून आज दुपारी एक अत्यंत दु:खद घटना समोर आली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्लॉटिंग व्यवसायात नावाजलेले व्यापारी अनिस अनवर पटेल (वय अंदाजे ४५) यांचे शनिवारी दुपारी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
अनिस पटेल हे माजी नगरसेवक पुनमचंद बमने यांचे निकटवर्तीय मित्र म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेले होते. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्नशील राहायचे, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हर्सुल परिसरात शोककळा पसरली असून, अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान, त्यांची नमाज-ए-जनाजा हर्सुल येथील ईदगाह मैदानात अदा करण्यात येणार असून, त्यानंतर स्थानिक कब्रस्तानात त्यांचा दफनविधी होणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
👉 एक उमदा, मदतीस तत्पर आणि सर्वांचा लाडका व्यक्ती गमावल्याची भावना आज हर्सुलच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे.