रोहित पवारांचा छत्रपती संभाजीनगर दौरा; कार्यकर्त्यांशी थेट संवादातून समस्या जाणून घेतल्या
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १२ :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिनांक 11 एप्रील शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेत संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक स्तरावरील अडचणी, कार्यकर्त्यांच्या भावना आणि संघटनात्मक मुद्दे जाणून घेतले.
यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी आमदार पवार यांच्यासमोर स्थानिक प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. त्यांनी सर्व निवेदन स्वीकारून संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कार्यकर्त्यांशी साधलेल्या थेट संवादामुळे पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत दानवे, संजय वाघचौरे, प्रदेश प्रवक्ता भीमराव हत्तियंबीरे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरोफोद्दीन मुल्ला, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच नगरसेवक नवीन ओबेराय, पुंडलिक अंभोरे, विशाल पाटील, प्रा. राहुलकुमार ताठे, सेवानिवृत्त डेप्युटी CEO मुकीम देशमुख, सूर्यकांत थोरात, आशिष पवार, अतुल गावंडे, सुशील बोर्डे, जि.प. सदस्य गीतांजली पाल, वरुण पाथ्रीकर आणि इतर आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या प्रसंगी आमदार रोहित पवार यांचा सत्कारही करण्यात आला, ज्याचा त्यांनी नम्रपणे स्वीकार केला. कार्यकर्त्यांच्या प्रश्नांवर थेट चर्चा करून संघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न या भेटीतून दिसून आला.
“कार्यकर्त्यांच्या विश्वासावर उभा असलेला संवादच संघटनेची खरी ताकद ठरते,” असा संदेश या दौऱ्यातून पुन्हा अधोरेखित झाला.