फुलंब्री कांग्रेसच्या शहराध्यक्षपदी मुदस्सर पटेल यांची नियुक्ती; संतोष मेटे यांना ग्रामीण तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी
महाराष्ट्र वाणी
फुलंब्री दि २८ :– काँग्रेस पक्षाच्या संघटन बळकटीकरणाच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री शहर आणि ग्रामीण भागात महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे खंदे समर्थक व दोन वेळा नगरसेवक राहिलेले मुदस्सर अजगर पटेल यांची फुलंब्री शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, ग्रामीण तालुकाध्यक्षपदी संतोष मेटे यांची निवड करण्यात आली आहे.
मुदस्सर अजगर पटेल हे काँग्रेस पक्षाशी दीर्घकाळापासून जोडलेले निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचे कुटुंब देखील काँग्रेसशी संबंधित असून त्यांचे वडील अजगर पटेल यांनी देवगीरी साखर कारखान्याचे दोन वेळा संचालक म्हणून काम पाहिले आहे. तसेच ते मार्केट कमिटीचे सदस्यही राहिलेले आहेत.
तरुण आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे मुदस्सर पटेल हे सलग दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले असून, स्थानिक पातळीवर त्यांचा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांमध्ये मजबूत प्रभाव आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांच्यावर शहराध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे फुलंब्री परिसरात काँग्रेस संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
खासदार डॉ. कल्याण काळे व कांग्रेसच्या सर्व नेत्यांनी मुदस्सर पटेल यांचे अभीनंदन केले आहे
“नव्या नेतृत्वातून काँग्रेसला नवी ऊर्जा मिळेल!”