मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार; पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते गौरव

मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार; पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते गौरव

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि १७ जून: मराठवाड्याच्या मातीतून घडलेले, समाजाभिमुख दृष्टिकोन असलेले आणि प्रशासनातील प्रामाणिकतेचा आदर्श ठरलेले अधिकारी अतुल चव्हाण यांना ‘मराठवाडा भूषण’ या मानाच्या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सध्या सामाजिक बांधकाम विभाग, पुणे येथे मुख्य अभियंता पदावर कार्यरत असलेले चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात विकासाच्या वाटचालीला नवी दिशा दिली आहे. अभ्यासू वृत्ती, जबाबदारीची जाणीव, आणि दूरदृष्टी यांच्या बळावर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.

शासनाच्या यंत्रणेत राहून समाजासाठी काहीतरी भरीव योगदान द्यावे, या उद्देशाने त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांच्या या योगदानाची दखल घेत मराठवाडा भूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.

हा गौरव केवळ चव्हाण यांचाच नव्हे, तर किनगाव, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देखील अभिमान वाढवणारा ठरला आहे.

 आहे.