जागतिक आरोग्य दिनानिमित्त मनपाचे शिबिर; 570 सफाई कर्मचाऱ्यांची तपासणी

जागतिक आरोग्य दिनानिमित्त मनपाचे शिबिर; 570 सफाई कर्मचाऱ्यांची तपासणी
जागतिक आरोग्य दिनानिमित्त मनपाचे शिबिर; 570 सफाई कर्मचाऱ्यांची तपासणी

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ९ :- महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. समीर राजूरकर, उपमहापौर मा. श्री. राजेंद्र जंजाळ तसेच मा. आयुक्त श्री. अमोल येडगे सर यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, आरोग्य विभाग व आय.एम.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

त्या अनुषंगाने दिनांक 09 एप्रिल 2026 रोजी आयोजित शिबिरामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील झोन क्रमांक 7, 8, 9 व 10 मधील 178 सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच, तीन दिवसांत झोन क्रमांक 1 ते 10 मधील एकूण 570 सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.

शिबिरातील तपासणीदरम्यान उच्च रक्तदाबाचे 79, मधुमेहाचे 19, त्वचारोगाचे 48, स्त्रीरोगाचे 13, सर्दी-खोकल्याचे 72 रुग्ण आढळून आले. नेत्ररोग तपासणीमध्ये 278 जणांची तपासणी करण्यात आली, यामध्ये 24 जणांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले व आवश्यक कर्मचाऱ्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच 170 रुग्ण (जनरल फिजिशियन) सामान्य स्वरूपाचे आढळले, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 268 छातीचे एक्स-रे करण्यात आले. आयुष्मान कार्ड (PMJAY) – 118 व आभा कार्ड – 301 काढण्यात आले. शिबिरादरम्यान एकूण 1371 रक्त तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये सी.बी.सी. (CBC) – 193, एल.एफ.टी. (LFT) – 187, के.एफ.टी. (KFT) – 187, थायरॉईड फंक्शन टेस्ट – 172 तसेच रँडम ब्लड शुगर – 344 अशा विविध तपासण्यांचा समावेश होता.

या कार्यक्रमासाठी आय.एम.ए अध्यक्ष डॉ. विकास देशमुख, डॉ. प्रशांत दरख (मूत्ररोग तज्ञ व IMA सचिव), डॉ. गीतेश दळवी (जनरल फिजिशियन), डॉ. केदार साने (जनरल सर्जन), डॉ. अमित महाजन, डॉ. प्रतिमा भाले (त्वचारोग तज्ञ), डॉ. अक्षय मारावार (अस्थिरोग तज्ञ), डॉ. सोनाली सावजी (विकृतीशास्त्र तज्ञ), डॉ. अर्चना साने (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. उमेश मालू (जनरल फिजिशियन), डॉ. इशरत बारूदवाला (स्त्रीरोग तज्ञ) यांचे सहकार्य लाभले व तसेच महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. उज्वला भामरे (सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी), डॉ. प्रेरणा संकलेचा, डॉ. प्रेमलता कराड, डॉ. जाधवर, डॉ. शेख, डॉ. आदित्यकुमार जोशी, श्री. बाशीद (नेत्र सहाय्यक) आदी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.