"काळासोबत बदललो नाही तर अस्तित्व धोक्यात; जगातील दिग्गज ब्रँड्सकडून घ्या धडा!"
महाराष्ट्र वाणी विषेश वृत्त
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ५ :- तंत्रज्ञान आणि व्यवसायाच्या जगात यश टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने बदल स्वीकारणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. काळानुसार स्वतःला अपडेट केले नाही, तर कितीही मोठे नाव असले तरी बाजारपेठेतून बाहेर पडण्यास वेळ लागत नाही. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी योग्य वेळी बदल स्वीकारला नाही आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागली.
एकेकाळी मोबाईल क्षेत्रावर वर्चस्व गाजवणारी नोकिया स्मार्टफोनच्या क्रांतीत मागे पडली. कोडककडे डिजिटल तंत्रज्ञान असूनही त्यांनी त्याचा योग्य वेळी स्वीकार केला नाही. एचएमटी आधुनिक घड्याळांच्या स्पर्धेत टिकू शकली नाही, तर ब्लॅकबेरी टचस्क्रीन स्मार्टफोनच्या युगाशी जुळवून घेण्यात अपयशी ठरली.