जिल्हा परिषदेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची 170 वी जयंती उत्साहात साजरी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २३ :- जिल्हा परिषदेत गुरुवारी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 170 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच," अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांना यावेळी अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल आणि अति मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) राघवेंद्रजी घोरपडे, प्रभारी जिल्हा उपायुक्त डॉ. रमण इंगळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या राष्ट्रवादी विचारांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यांची विचारधारा जपणे हा जयंती साजरी करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
प्रभारी जिल्हा उपायुक्त डॉ. रमण इंगळे यांनी लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान अमूल्य असून, त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी जयंती साजरी करणे हा प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा क्षण असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर बिडाईत (सहा पशुधन विकास अधिकारी) यांनी केले, तर उपस्थितांचे आभारही त्यांनीच मानले.