औषध विक्रेत्यांचा उद्या बंद; रुग्णांसाठी प्रशासन सज्ज, जिल्हानिहाय नियंत्रण कक्ष सुरू

औषध विक्रेत्यांचा उद्या बंद; रुग्णांसाठी प्रशासन सज्ज, जिल्हानिहाय नियंत्रण कक्ष सुरू
औषध विक्रेत्यांचा उद्या बंद; रुग्णांसाठी प्रशासन सज्ज, जिल्हानिहाय नियंत्रण कक्ष सुरू

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.१९ :– औषध विक्रेत्यांच्या संघटनेने बुधवार दि.२० मे रोजी एक दिवसीय बंद पुकारला असून, या काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर विभागात जिल्हानिहाय नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. अत्यावश्यक औषधे उपलब्ध न झाल्यास नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या रुग्णांना नियमित औषधांची आवश्यकता असते, त्यांनी बंदपूर्वीच आवश्यक औषधांचा साठा करून ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हानिहाय नियंत्रण कक्ष व संपर्क क्रमांक :

१) छत्रपती संभाजीनगर :

सहायक आयुक्त (औषधे) शा. ना. साळे – 8983290162

सहायक आयुक्त (औषधे) वि. वि. नांगरे – 7387561343

औषध निरीक्षक म. भा. पैठणे – 9021899018

२) जालना :

सहायक आयुक्त (औषधे) जी. द. जाधव – 8379016068

३) परभणी :

सहायक आयुक्त (औषधे) ना. सी. भालेराव – 9405783636

४) हिंगोली :

सहायक आयुक्त (औषधे) ना. सी. भालेराव – 9405783636

५) बीड :

सहायक आयुक्त (औषधे) मा. ज. निमसे – 9423749616

६) नांदेड :

अ. तु. राठोड – 8369027068

७) धाराशिव :

सहायक आयुक्त (औषधे) ब. दा. मरेवाड – 8275175232

औषध निरीक्षक श्रीमती स्वा. क. कुपकर – 8830801806

८) लातूर :

सहायक आयुक्त (औषधे) b. दा. मरेवाड – 8275175232

आवश्यकता भासल्यास नागरिकांनी जिल्हानिहाय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त (औषधे) वि.वि. नांगरे यांनी सांगितले.

“औषधांचा तुटवडा होऊ देऊ नका; बंदपूर्वीच खबरदारी घ्या,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.