गॅलेक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चमत्कार! मायस्थेनिया ग्रॅव्हिसवर मात करत रुग्णाचा नवजीवन प्रवास
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३ मे :- अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या एका रुग्णाने मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मिळ आजारावर यशस्वीपणे मात करत नवजीवन मिळवले आहे. या आजारामुळे शरीरातील स्नायूंची शक्ती झपाट्याने कमी होत जाते, ज्यामुळे बोलणे, गिळणे आणि श्वास घेणे यासारख्या महत्त्वाच्या क्रियांवर परिणाम होतो.
सदर रुग्णाची प्रकृती इतकी खालावली होती की, त्याला श्वसन निकामी झाल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले होते. परिस्थिती अत्यंत गंभीर असताना गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्णावर प्लाझ्माफेरेसिस हा अत्याधुनिक उपचार केला. ही प्रक्रिया डायलेसिसप्रमाणेच असून, रक्तातील हानिकारक अँटीबॉडीज काढून टाकण्याचे काम करते. या उपचारामुळे रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेचा चुकीचा प्रतिसाद कमी करण्यात यश आले.
हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. राहुल वाहटुळे यांनी सांगितले की, “उपचारानंतर अवघ्या १० ते १५ दिवसांत रुग्णामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. ही प्रगती वैद्यकीय दृष्ट्या अत्यंत समाधानकारक आहे.”
डिस्चार्जच्या वेळी रुग्ण पूर्णपणे शुद्धीत होता आणि कोणत्याही आधाराशिवाय बोलणे, गिळणे व श्वास घेणे तसेच चालणेही करू शकत होता. स्वतः रुग्णानेही उपचारांबद्दल समाधान व्यक्त केले.
या यशस्वी उपचारामुळे गंभीर आजारांवर आधुनिक वैद्यकशास्त्र किती प्रभावी ठरू शकते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
👉 गॅलेक्सी हॉस्पिटलच्या या कामगिरीने पुन्हा सिद्ध केलं — योग्य उपचार मिळाले तर जीवन पुन्हा फुलू शकतं!