अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ‘विशेष योजना’ राबवा – शेख अब्दुल रहीम यांची अल्पसंख्याक आयुक्तांकडे मागणी!
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २ ऑगस्ट :- हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनच्यावतीने नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या नवनियुक्त अल्पसंख्याक आयुक्त मा. श्रीमती प्रतिभा इंगळे (IAS) यांचा सत्कार करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी दि १ ऑगस्ट रोजी शाल, पुस्तक व पेन देऊन स्वागत करत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण योजना राबवाव्यात, अशी विनंती निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात पुढील मागण्या मांडण्यात आल्या:
1. शहरात ‘उर्दू घर’ ची स्थापना.
2. मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी बार्टी-सारथीच्या धर्तीवर स्वायत्त संस्था.
3. 1ली ते 10वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गणवेश योजना.
4. प्रोत्साहन भत्त्याची पुन्हा सुरूवात.
5. शिष्यवृत्ती योजना सक्रिय करणे.
आयुक्त प्रतिभा इंगळे मॅडम यांनी सदर निवेदन पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयातील अल्पसंख्याक विभागाच्या सचिवांकडे पाठवण्यात येईल, असे सांगितले.
शेवटी, शेख रहीम यांनी असेही नमूद केले की, “अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती घडवण्यासाठी सरकारने यामध्ये सक्रियता दाखवावी, हीच काळाची गरज आहे.
➤ वाचत राहा... तुमच्या समाजाच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करणारी प्रत्येक बातमी, महाराष्ट्र वाणी वर!