हायवा ट्रक चोरी प्रकरण उघड! आरोपीसह ट्रक जप्त – बिडकीन पोलिसांची जबरदस्त कामगिरी

हायवा ट्रक चोरी प्रकरण उघड! आरोपीसह ट्रक जप्त – बिडकीन पोलिसांची जबरदस्त कामगिरी

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १३ जून :- बिडकीन पोलिसांनी ट्रक चोरीच्या प्रकरणात मोठी कामगिरी करत चक्क ट्रकसह चोरट्याला अटक केली आहे. चितेगाव येथील कडुबाळ नरवडे यांच्या तक्रारीवरून सुरू झालेल्या तपासात केवळ आठवड्याभरात चोरी गेलेला २.५५ लाखांचा हायवा ट्रक (MH-20-AT-9532) पोलिसांनी चाळीसगाव येथून हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश घुगे, पोह. विष्णु गायकवाड, पोह. शरद पवार यांनी केली.

काय आहे प्रकरण?

7 जून रोजी रात्रीपासून 8 जून सकाळपर्यंत चितेगाव येथून फिर्यादीचा ट्रक चोरीस गेला होता. यासंदर्भात कलम 303(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अनेक CCTV फुटेज तपासून आणि माहिती गोळा करत ट्रक कन्नडमार्गे गेल्याचे शोधून काढले.

तपासात कळाले की संदीप परसराम पवार (रा. वडनेर तांडा, ता. कन्नड) नावाचा चालक या ट्रक चोरीमागे आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ट्रक चाळीसगाव येथे विक्रीसाठी ठेवले असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी लगेच कारवाई करत ट्रक संदीपच्या ताब्यातून जप्त केला आणि त्याला अटक केली. न्यायालयाने आरोपीस 15 जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन:

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अण्णापूर्णा सिंग, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ही कारवाई म्हणजे बिडकीन पोलिसांची दक्षता, सतर्कता आणि तपासातील कौशल्य याचे उत्तम उदाहरण ठरली आहे.