सकल मराठा समाजाचा इशारा; नवनाथ वाघमारेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

सकल मराठा समाजाचा इशारा; नवनाथ वाघमारेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
सकल मराठा समाजाचा इशारा; नवनाथ वाघमारेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १८ :- सकल मराठा समाजाच्या वतीने महिलांनी डॉ. मनीषा मराठे यांच्या नेतृत्वाखाली काल दिनांक 17 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सीपी कार्यालयात धाव घेतली. नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) 2023 मधील कलम 79, 196, 352, 353 आणि 356 अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

यासंदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, दोन दिवसांत गुन्हा दाखल करून नवनाथ वाघमारे यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन सीपी साहेबांनी दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.

दरम्यान, दोन दिवसांत कारवाई न झाल्यास संतप्त समाजबांधवांकडून कायदा हातात घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती बिघडल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.