"शालेय ज्ञानाचा आरंभ! मौलाना जोहर उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप"

"शालेय ज्ञानाचा आरंभ! मौलाना जोहर उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप"
"शालेय ज्ञानाचा आरंभ! मौलाना जोहर उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप"

महाराष्ट्र वाणी न्युज 

सिल्लोड (ता. १७ जून) :- मौलाना मोहम्मद अली जोहर एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड संचलित व शासनमान्य मौलाना जोहर उर्दू प्रायमरी स्कूल, सिल्लोड येथे विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात सोसायटीचे अध्यक्ष शेख मोहम्मद कैसर आझाद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिस अहमद अन्सारी, पालक वर्ग, तसेच युवा नेते आवेस आझाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनोबल वाढवणारे मार्गदर्शन देण्यात आले. शिक्षण हे प्रत्येक मुलासाठी मूलभूत हक्क असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळा आणि संस्थेचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

शाळेच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधण्याचा उद्देश ठेवत संस्थेच्यावतीने नियमित उपक्रम राबवले जात आहेत. यावेळी उपस्थित पालकांनी संस्थेच्या उपक्रमांचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांसाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

.