वाचनसंस्कृती जोपासणारा उपक्रम : श्रमदान ग्रंथालयाच्या वाचन स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात

वाचनसंस्कृती जोपासणारा उपक्रम : श्रमदान ग्रंथालयाच्या वाचन स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात
वाचनसंस्कृती जोपासणारा उपक्रम : श्रमदान ग्रंथालयाच्या वाचन स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे, ( प्रतिनिधी) ७ जून :— वाचनसंस्कृतीला बळकटी देणारा आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारा एक प्रेरणादायी उपक्रम श्रमदान ग्रंथालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला. श्रमदान मारुती मंडळ, पुणे यांच्या तर्फे आयोजित वाचन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भिकूबाई मेंकुडले सभागृह, कस्तुरे चौक येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात मंडळाचे नामदेव मानकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी वाचन संस्कृतीचे सामाजिक जीवनातील महत्त्व विशद करताना तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली.

प्रमुख पाहुण्यांमध्ये

▪️ ॲड. प्रतापदादा परदेशी – ज्येष्ठ समाजसेवक

▪️ प्रसाद भडसावळे – लेखक व विचारवंत

▪️ गुरुवर्य प्रकाश भाऊ शिंदे – मठाधिपती, सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्ट

▪️ प्रसाद भिमाले – बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ता

▪️ दीपा परब – अध्यक्षा, रणरागिणी ग्रुप

▪️ आरतीताई कोंढरे – नगरसेविका

याशिवाय विश्वास भोर, पियुष शहा आणि नितीन पंडित यांचीही उपस्थिती लाभली.

या वेळी महिला व बाल वाचकांसाठी आयोजित वाचन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्हे आणि आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. सर्व पाहुण्यांनी वाचन संस्कृतीविषयी प्रेरणादायी विचार मांडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे संयोजन अजय कोंढरे यांनी केले. बक्षीस प्रायोजक म्हणून संदीप रासकर यांचे आणि शिवसयाद्री चॅरिटेबल ट्रस्टचे योगदान महत्त्वाचे ठरले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. मोहनीश सावंत यांनी केले. त्यांनी सर्व मान्यवर, सहभागी, पालक आणि श्रमदान मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. वाचनासारख्या उपक्रमांना सातत्याने चालना देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.